CDS exam काय आहे? What is CDS exam in marathi?

 CDS exam ( कंम्बाईन डिफेंन्स सर्विस) ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (Upsc) आयोगाद्वारे आयोजित केली जाते. वर्षातून दोन वेळा ही परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेमधून भारतीय मिलिटरी ॲकॅडमी (IMA), भारतीय नौदल ॲकॅडमी (INA), भारतीय वायुसेना ॲकॅडमी(AFA), ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी (OTA) या पदांसाठी निवड केली जाते.
लहान वयात तुम्हाला मोठा अधिकारी बनायचे असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.


CDS exam साठी शैक्षणिक योग्यता-

येथे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.

भारतीय मिलिटरी ॲकॅडमी(IMA)

या पदासाठी भारताच्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे.

भारतीय नौसेना ॲकॅडमी (INA)

या पदासाठी chemistry, math आणि physics मधून bsc किंवा engineering ची पदवी आवश्यक आहे.

भारतीय वायुसेना ॲकॅडमी(AFA)

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि 10+2 Math आणि physics विषय आवश्यक किंवा engineering ची पदवी आवश्यक.

ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी (OTA)

भारताच्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक.

CDS exam साठी वयोमर्यादा-

1) भारतीय मिलिटरी ॲकॅडमी (IMA) साठी वय 19 ते 24 वर्ष.
2) भारतीय नौदल ॲकॅडमी (INA) साठी वय 19 ते 24 वर्ष.
3) भारतीय वायुसेना ॲकॅडमी (AFA) साठी वय 19 ते 24 वर्ष.
4) ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी (OTA) साठी वय 19 ते 25 वर्ष.

आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे उमेदवार अविवाहित असणे अनिवार्य.

नोट:  जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात आहेत ते पण आवेदन करू शकतात परंतु SSB इंटरव्यू च्या आधी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.


CDS Exam पॅटर्न:

ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये  होते. पहिला टप्पा हा लिखित आणि दुसरा टप्पा इंटरव्यू चा असतो.

1) लिखित परीक्षा 300 मार्कची असते.
2) यामध्ये इंग्रजी,  सामान्य ज्ञान आणि प्राथमिक  गणित या विषयांचा समावेश असतो.
3) ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी (OTA) साठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांचा समावेश असतो. ही परीक्षा 200 मार्कची असते.
4) या टप्प्यांमध्ये पास झाल्यावर आपण interview मध्ये सामील होऊ शकता.

CDS Exam मध्ये यशस्वी होण्यासाठी काही टिप्स-

1) सर्वप्रथम NCERT च्या पुस्तकांपासून सुरुवात करावी.
2) रोज एक इंग्रजी वर्तमानपत्र( Newspaper) वाचण्याची सवय लावावी.
3) मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावे 
4) इंटरनेट चा पुरेपूर वापर करावा.


नोट: 

CDS exam मध्ये निगेटिव्ह मार्किंग समावेश आहे . अजून तुम्हाला या exam विषयी जास्त माहिती हवी असेल तर Upsc च्या वेबसाईट वरील CDS Exam notification वाचावी.

        चला आता तुम्हाला CDS Exam बद्दल बेसिक माहिती मिळाली असेल. जर तुमच्या मनात अजून काही शंका असेल तर मला कमेंट द्वारे कळवा. तुमच्या जर कोणत्या मित्राला गरज असेल तर त्याला सुद्धा पाठवणे विसरू नका. जर तुम्हाला पोस्ट आवडली तर सोशल मीडियावर जरूर शेअर करा. धन्यवाद!

6 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>