कला शाखेतील करीअरच्या संधी Carrier opportunies in the Art.

        आजचा तरुण वर्ग हा उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वार्थाने व मजबूत बनविण्यासाठी योग्य दिशा देण्याची गरज आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी योग्यवेळी मार्गदर्शन करणे फार गरजेचे आहे.  दहावीत कमी गुण मिळाले म्हणून कला शाखेकडे जायचं हा कल खूप वाढलेला दिसत आहे. त्यामुळे कला शाखेतील विद्यार्थी दिशाहीन होतात.
              कला शाखेत  शिकत असताना प्रत्येक  विषय विद्यार्थ्याने गांभीर्याने घेतला तर या शाखेमध्ये करिअरच्या मोठ्या संधी चालून येतात. या शाखेत विषय निवडताना गांभीर्याने निवडायला हवे विषय निवडताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा कल तपासून पाहणे गरजेचे आहे.


कला शाखेतील करीअरच्या संधी ( Carrier opportunies in the Art)

1) अर्थशास्त्र विषयातील करिअर

अर्थशास्त्राच्या विषयात उद्योग व्यवसाय, ग्रामीण विकास नियोजन शेतीचे अर्थशास्त्र भविष्य वेध देशांच्या गरजांची मांडणी असे अनेक संधी आहेत. अर्थशास्त्रीय संशोधक, अर्थशास्त्रीय विश्लेषक व अर्थशास्त्रज्ञ रिसर्च फेलोशिप यासारख्या पदांवर अनुभव व शिक्षण तर मिळतेच तसेच पगारही मोठ्या प्रमाणात मिळतो.

भारतातील नावाजलेल्या  संस्थांमध्ये एम. ए अर्थशास्त्र पूर्ण केलेल्या उमेदवारास गोखले  इन्स्टिट्यूट पुणे, स्कूल ऑफ इकनॉमिक्स दिल्ली या नामांकित  संस्थात संधी उपलब्ध आहेत. याशिवाय एम. ए अर्थशास्त्र  पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये, शेअर बाजारात इन्शुरन्स एजन्सी मध्ये कोणत्याही कंपनीचा इन्व्हेस्टमेंट लिस्ट अँनालिस्ट म्हणून सहज नोकरी मिळते.  वृत्तपत्रात अर्थविषयक किंवा अर्थवृत्त संकलक म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते.

2) सामाजिक शास्त्र विषयातील करिअर 

समाजाची रचना, न्यायव्यवस्था, सामाजिक घडामोडी, कुटुंब पद्धती ,अशा सर्व घटकांचा या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये सामाजिक शास्त्र या विषयाचा  मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. सामाजिक शास्त्रातील ‌अनेक मुले एम. एस. डब्ल्यू ( MSW) सारखा कोर्स करून स्वयंसेवी संस्थांमध्ये ( NGOs) मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. खरेतर  कोणत्याही विषयात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येतो.

3) राज्यशास्त्र विषयातील करिअर 

राज्यशास्त्र हा विषय सुद्धा महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो. राजकीय संशोधक, राजकीय विश्लेषक व राज्यशास्त्र  रिसर्च फेलोशिप यांसारख्या पदांवर काम करण्याची संधी मिळते. भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ( ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत.)

राज्यपातळीवर विधानसभा व विधान परिषद, केंद्र पातळीवर लोकसभा व राज्यसभा यांच्या निवडणूका नियमित होत असतात. त्यामुळे निवडणूक विश्लेषक म्हणून मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत.

वृत्तपत्र माध्यम व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येच यांची गरज असते, असे नाही तर राजकीय पक्षांना देखील यांची खूप गरज असते. 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या  विजयामागे राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांचे नाव घेतले जाते. आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील विजयामागे योगेंद्र यादव यांचे नाव घेतले जाते. याशिवाय सुद्धा राजकीय विश्लेषक म्हणून सुहास पळशीकर, कुमार केतकर यांची नावे घेतली जातात.

मागील दहा वर्षात प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघात प्रचार कसा करावा, त्यासाठी काय पद्धत वापरावी, जाहीरनामा कसा असावा, माध्यमाचा उपयोग कसा करावा या सर्वांबाबत राजकीय विश्लेषकांचा उपयोग करून घेतात. त्यामुळे या क्षेत्रात राज्यशास्त्र हा विषय आणि त्याचबरोबरीने राजकारणाचा व्यावहारिक ज्ञान सोबत असल्यास या क्षेत्रात भरपूर वाव आहे.

 वृत्तपत्रात राजकारण विषयक किंवा राजकीयवृत्त म्हणून संकलन करण्याची संधी मिळू शकते. कोणत्याही विषयात पदवी घेतल्यानंतर रितसर एम.ए ची पदवी घेता येते. त्यानंतर SET किंवा NET परीक्षा देऊन प्राध्यापक  होता येते.

4) LLB & MBA

पुणे शहरात भारतातील नावाजलेले महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था आहेत. उदा. LLB या विषयासाठी जवळपास 18 महाविद्यालय आहेत भारतातील अग्रगण्य  विधी महाविद्यालय पुण्यातच आहे. कोणत्या विषयांमध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा विधी ( LAW) विषयाचा अभ्यास करता येतो. MBA या विषयासाठी जवळपास 48 महाविद्यालय पुणे आणि त्याच्या परिसरात आहे.

5) Mass communication,Journalism

या विषयासाठी जवळपास 15 महाविद्यालय पुणे आणि त्याच्या परिसरात आहेत. पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिट्यूट, सिम्बायोसिस ही महत्वाची महाविद्यालये आहेत. मागील काही वर्षात  बातम्या दाखवणारे न्यूज चॅनेल खूप वाढलेले आहेत
 त्याचबरोबरीने वर्तमानपत्राची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याची प्रचंड संधी आहे.

ज्या मुला-मुलींना संवाद लिखाण अभिनय तांत्रिक सहाय्य अशा गोष्टींमध्ये रस आहे त्यांनी चल चित्र निर्माण कला ( Cinematography) कोर्स करावे. भारतात सर्वात नावाजलेले 
FTTI - film and television institute of india , pune  येथे mass communication and journalism कोर्सेस तुम्ही पूर्ण करु शकता. 

6) इतिहास विषयातील करिअर

इतिहास विषयामध्ये करियर करू इच्छिणाऱ्या बी.ए इतिहास व पुढे एम. ए इतिहास करून प्राध्यापक होता येते. तसेच इतिहास संशोधक मंडळाच्या माध्यमातून इतिहास कालीन संशोधन करण्याची संधी मिळू शकते. पुरातत्व विभागामध्ये काहीशा संधी उपलब्ध आहेत. स्पर्धापरीक्षांमध्ये इतिहास या विषयाचा फार मोठा उपयोग होऊ शकतो.

7) स्पर्धा परीक्षा 

स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ( mpsc), स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा (ssc), पी.एस. आय/ एस.टी.आय, विक्रिकर निरीक्षक, मंत्रालय साहाय्यक, तलाठी, लिपिक, टंकलेखक, बँक अधिकारी, रेल्वे भरती , केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अशा कितीतरी परीक्षा तुम्ही देऊ शकता.या परीक्षा देताना कला शाखेतील विद्यार्थ्यांना जास्त फायदा होऊ शकतो.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>