स्त्री भ्रूण हत्या वर निबंध मराठी. Essay on stri bhrun hatya in Marathi

 Essay on stri bhrun hatya in Marathi  

स्त्री भ्रूण हत्येवर मराठी निबंध हा निबंध तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत लिहून दिलेला आहे .शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वाचकांसाठी असा हा निबंध आहे.स्त्री भ्रूण हत्या वर मराठी निबंध  Essay on stri bhrun hatya in Marathi

      अबला नारी हाय तेरी यह कहानी
     आचल में दूध और आंखों में पाणी 

असा कोणता अपराध घडतो मुलीच्या हातून की जिला  मातेच्या उदरातच नष्ट केलं जातं ? का तर का तर ती मुलगी आहे म्हणून. आई पाहिजे, बायको पाहिजे, मग मुलगी का नको. जर एखाद्या कुटुंबात जर एखादी स्त्री साक्षर असेल  तर ती  संपूर्ण कुटुंब साक्षर बनवते.

जेव्हा भारतामध्ये 100% स्त्रिया साक्षर होतील, तेव्हा भारत विकसित देश म्हणून गणला जाईल. आई मला जगायचे ही आर्त हाक जेव्हा आईच्या कानावर पडते, तेव्हा तिचा जीव कासावीस होऊन तिचे डोळे पाणावतात. पण काय करणार ? रूढी परंपरेने ग्रासलेल्या देशात तिच्यासारख्या अनेक कळ्या रोज खुडल्या जातात.

पण तिला जीवन मिळणे कुठे शक्य आहे. आई मला ही सुंदर जग पहायचंय. तुमच्या सर्वांचा सहवास अनुभव अनुभवायचाय. हे ती सतत सांगत असते, परंतु त्या पाणावलेल्या डोळ्यांना ते दिसत नाही नी कानाला ऐकू येत नाही. घरच्यांचा दबाव आणि मुलगी झाली ही समाजाची ओरड‌ त्या मागे असते.

हतबल झालेली ती माऊली या रुढी परंपरेला शरण जाते. नाईलाजाने तिला या कळीला उतरण्याआधीच खुडावे लागते. आणि छोट्याशा सोनपरिचा अंत होतो. जेव्हा त्या कोवळ्या जिवाचा पिताच तिचा अंत करतो, त्यावेळी हा समाज त्याला विरोध करत नाही.

        कहते है दुनिया गोल है
        बेटी का मोल अनमोल है
       बेटी पिता की जान है 
        बेटी पिता का इनाम है |
       कहते है बेटी है घर की लक्ष्मी
       उसके जैसा नही कोई
       बेटी घरकी शान है
       बेटी घर का अरमान है ||

मग बेटी जन्माला येऊन कोणते नुकसान करते. मला कळत नाही. लोकांची मानसिकता खूप वेगळी झाली आहे. ती ओरडून ओरडून सांगत असते, मला हे सुंदर जग पाहायचंय, सुंदर निसर्गात बागडायचंय,  अनुभवायचंय, संस्कृती शिकायची आहे. तिच्या कुशीत जगायचंय. मला माझी आई पाहायचीय. सावित्रीबाई फुले , राणी लक्ष्मीबाई यांच्या आईसुद्धा तुझ्यासारख्या वागल्या असत्या तर म्हणूनच तर, म्हणते कदाचित तुझी मुलगी प्रतिभासारखी स्वर बनू शकते. आता तूच ठरव मला जगायचंय की निर्दयपणे मारायचंय.

परंपरेची बंधन तोडणे खरं तर अवघड असते पण एकदा झाले की परंपरा बदलायला वेळ लागत नाही. खरंतर मुलीचा जन्म म्हणजे काळजी, परक्याचे धन म्हणूनच तिच्याकडे पाहून तसेच संस्कार केले जातात. लेक वाढू लागली आई बापाच्या आनंदापेक्षा तिच्या चिंता जास्त सतावतात. स्त्रीला वेलीची उपमा दिली जात होती. जी आधाराविना उभी राहू शकत नाही.

लहानपणी वडिलांच्या धाकात लेक राहते. तरुणपणी नवऱ्याच्या  ताब्यात आणि म्हातारपणी मुलांच्या मनाप्रमाणे त्यांच्या तालावर तारेची कसरत करत जीवन जगत असते हीच स्त्रीची स्थिती आहे. लेक स्त्री म्हणून जन्माला येत नाही. ती संस्कारामुळे स्त्री बनते.

आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते. स्त्रीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिले असते तर, जन्माला येणारा मुलगा - मुलगी यामुळे कुटुंबीयांना सारखाच आनंद झाला असता. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते.

 मैं बेटी बनकर आयी हू माँ- बाप के जीवन में
बसेरा होगा मेरा कल किसी और आँगन में
क्या यही रीत बागवान ने बनाई है
देकर जन्म पाल पोसकर बडा किया और
वक्त आया तो उन्ही हाथोंसे हमे बिदा किया
बेटी समजकर परिभाषा अपने जीवन की बना
लेती है अभिलाषा एक अतुट बंधन की
क्या बस यही हम बेटीयोंका नसीब होता है/

या माझ्या बांधवांनो अखिल मानव जातींनो ' धर्म मानू एकतेचा मंत्र देवू प्रेमाचा ' या गड्यांनो स्वागत लेकीच्या जन्माचे करूया....

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>