जनहित याचिका कशी दाखल करावी How to file a PIL in Marathi.

 जनहित याचिका ( Publice interest litigation) म्हणजे जेव्हा जनतेच्या सार्वजनिक हितासाठी ( Publice interest) साठी न्यायालयात खटला दाखल केला जातो. उदा. प्रदूषण, दहशतवाद, रस्ते सुरक्षा, अवैध बांधकामे म्हणजे या गोष्टींमुळे जनतेच्या सार्वजनिक हितावर परिणाम होतो. मोठया प्रमाणावर जर सार्वजनिक हितावर प्रभाव पडत असेल तर न्यायालयात जनहित याचिका दाखल करता येते.जनहित याचिका कशी दाखल करावी. ( How to file a PIL in marathi)

भारतातील कोणताही सामान्य व्यक्ती जनहित याचिका न्यायालयात दाखल करू शकतो. जनहित याचिका दाखल करायची असेल तर ई-मेल, पत्राच्या माध्यमातून किंवा कोर्ट स्टॅम्प करून दाखल करू शकता.

काही वेळेस न्यायालय स्वतःहून एखाद्या पत्राचे जनहित याचिकेमध्ये रूपांतर करू शकते. म्हणजे न्यायालय स्वतःहून जनहित याचिका दाखल करते.

भारतीय संविधानातील कलम 32 नुसार तुम्ही सर्वोच्च न्यायालयात ( Supreme court) ही याचिका दाखल करू शकता.

भारतीय न्यायालयातील कलम 226 नुसार उच्च न्यायालय ( High court) मध्ये याचिका दाखल करु शकता.

फौजदारी प्रक्रिया संहिता ( criminal procedure code) मधील सेक्शन 133 नुसार दंडाधिकारी न्यायालयात ( Court of magistrate) मध्ये सुध्दा दाखल करू शकता.

         जनहित याचिका दाखल करण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते, ते कोर्ट ठरवते. या याचिकेमुळे मोठ्या प्रमाणात जनतेचे हित जोपासले गेले पाहिजे. कोणत्याही एका व्यक्तीसाठी हि याचिका दाखल करता येत नाही.

जनहित याचिका कोणाविरुद्ध दाखल करू शकतो.

जनहित याचिका ही केंद्र सरकार, राज्य सरकार,महानगरपालिका आणि कोणत्याही खाजगी पक्ष/ व्यक्ती विरुध्द जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते.

जनहित याचिकेचे महत्व

  1. जे गरीब लोक किंवा अपंग लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनहित याचिकेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
  2. ज्यांना कोणाला हक्क नाकारले गेले आहेत त्यांच्यापर्यंत मानवी हक्क पोहचविण्यासाठी उपयोग होतो.
  3. जनहित याचिका ही सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. जे कायद्याचे राज्य आणि कायदा आणि न्याय यांच्यात समतोल ठेवण्यास मदत होते.
  4. जनहित याचिकेमुळे खूप साऱ्या महत्वाच्या सामाजिक मुद्यांवर प्रकाश टाकला गेला आहे.

जनहित याचिकेचे काही तोटे

1) जनहित याचिकेमुळे कधी- कधी नवीन समस्या निर्माण होतात. उदा. एखाद्या प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कोर्टाने बंदी घातली तर त्या कंपनीतील कामगार यांच्यावर बेरोजगारीचे संकट येते.

2) कोर्टावर जास्तीचे ओझे वाढते. म्हणजे कोणीही उठून सुटून कोर्टात स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी, राजकीय लाभासाठी याचिका टाकत असतो. जे मूळ:तर गरीब लोक व शोषित लोक आहेत ते बाजूला राहतात.

निष्कर्ष 

जनहित याचिकेद्ववारे अनेक मुद्दे आजपर्यंत निकाली निघाले आहेत. जसे की महिलांचे छळ, भिकारी, कैद्यांचे छळ, कामगार, अंधव्यक्ती, शोषित मुले इत्यादींना आत्तापर्यंत जनहित याचिकेद्वारे न्याय मिळाला आहे.

                   मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. या पोस्टला जास्तीत जास्त लोकापर्यंत शेअर करायला विसरू नका. अशीच मजेशीर उपयुक्त माहिती साठी या ब्लॉगला भेट देत रहा. धन्यवाद !

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>