कुत्रिम बुद्धिमत्तेबद्दल माहिती. What is artificial intelligence in Marathi.

          कृत्रिम बुद्धिमत्ता(Artificial intelligence) म्हणजे सॉफ्टवेअर/अल्गोरिदम च्या मदतीने माहिती शिकण्याची आणि आत्मसात करण्याची क्षमता जिचा उपयोग मशीन किंवा उपकरणाच्या मदतीने काही विशिष्ट भूमिका अथवा काम पूर्ण करून समस्या सोडवण्यासाठी केला जाऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम पद्धतीने बौद्धिक क्षमतेचा विकास.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास (History of artificial intelligence)

कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक जॉन मैकार्थी ( john McCarthy) हा आहे. त्याचे मित्र मार्विन मिस्की, हर्बट सायमन आणि ऐलेन नेवेल यांनी मिळून सुरुवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास आणि संशोधन केले.  या संकल्पनेचा उगम 1950 च्या सुरुवातीला आढळतो. मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या जगात या संकल्पनेची  प्रगती अलीकडे झालेली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे ( Artificial intelligence benifits)

शैक्षणिक -

           शिक्षण क्षेत्रात शिक्षकांचे शैक्षणिक कसब, आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रक्रियेतील सहभाग सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात तीन प्रकारे उपयोग होऊ शकतो.
  1. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर प्रत्येक विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती गोळा करून त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण आराखडा बनवणे. त्यांच्या गरजा ओळखून त्यानुसार शिक्षणाचे साधन , प्रकार आणि अनुभव यावर आधारीत शैक्षणिक कार्यक्रम तयार करणे.
  2. स्मार्ट सहाय्यक साधनांचा ( यात ॲमेझॉन अलेक्सा, गूगल होम, ॲपल सिरी आणि मायक्रोसॉफ्ट कोर्टाना) आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आवश्यक मदत घेणे.
  3. शिक्षक वर्गाला इतर अनेक कामे सोपी करण्यास उपयोग होऊ शकतो. जसे की, गुण आणि श्रेणी वाटप गुणपत्रिका तयार करणे.
  

डेटा ॲनालिटिक्स -

        कृत्रिम  बुद्धिमत्ता आधारीत डेेटा ॲनालिटिक्सचा वापर विविध विद्यााशखांमधील अध्ययन आणि संशोधनासाठी होऊ शकतो.

आरोग्य -

      कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रोगनिदान प्रणालीद्वारे दुर्गम भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरवत येईल. एखादे खूप किचकट ऑपरेशन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकतो. खूप कमी वेळात जास्तीत जास्त लोकांचा इलाज केला जाऊ शकतो.

सुरक्षा -

सेना मध्ये जवानांच्या जागी रोबोट चा वापर करू शकतो.  त्यामुळे याचे महत्त्व वाढते.

शेती -

कृषी क्षेत्रामध्ये या प्रणालीचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न त्यांची उत्पादकता वाढवली जाऊ शकते ,आणि त्यांच्या वेळेचा दुरुपयोग कमी केला जाऊ शकतो. पिकांवर पडणाऱ्या रोगांची ओळख पटवून तसेच शेतीला धोकादायक  प्रसंगात कीटकांची ओळख पटवून त्यांची तीव्रता कमी करता येऊ शकते.
                           कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे जे काम मनुष्य करू शकत नाही ते काम आपण करू शकतो. उदा. समुद्रामध्ये खोल खनिज, पेट्रोल आणि इंधन यांचा शोध घेणे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे तोटे ( disadvantages of artificial intelligence)

  • कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बेरोजगारी खूप वाढेल. फॅक्टरी, कारखाने, बँक आणि याचा जास्त वापर केल्यामुळे हजारो लोकांच्या नोक-यांवर गदा येऊ शकते.
  • या स्मार्ट प्रणालीचा वापर करताना कोणी असावधानी बाळगली तर याचा घातक परिणाम होऊ शकतो.
  • कृत्रिम बुद्धिमत्तामुळे नवीन सामाजिक उतरंड तयार होऊन सामाजिक सलोखा आणि अस्तित्वात असलेली उतरंड बिघडू शकते. ज्यामुळे सामाजिक बंध तुटून खालच्या स्तरातील लोकांचे शोषण होऊ शकते.
  • याचा  खूप वापर केला गेला तर मानव जातीला धोका निर्माण होऊ शकतो.

निष्कर्ष -

कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय खूप सार्‍या दशकांपासून ज्वलंत विषय आहे. याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे सुद्धा आहेत. तसेच याचे वाईट परिणाम व चांगले परिणाम यावर वर चर्चा करून कृत्रिम बुद्धिमत्ता अंमलात‌ आणली गेली पाहिजे.

                   या पोस्टमध्ये तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी माहिती मिळाली असेल, तरी पण अजून तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट द्वारे मला कळवा.  तुम्हाला जर पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>