प्रधानमंत्री जन धन योजना. Pradhanmantri jan dhan yoina in Marathi

                  15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जन धन योजनेची घोषणा केली.  त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला या योजनेनुसार बँकेत एक खाते काढावे लागणार आहे. या खात्यामध्ये 1 लाख  रुपयांचा विमा आणि Rupay debit card ची सुविधा मिळणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजना खास गरिबांना ध्यानात ठेवून आणि त्यांना बचतीची सवय लागावी आणि भविष्यातील सुरक्षेची  भावना यावी म्हणून योजना खास आहे.
प्रधानमंत्री जन धन योजना (Pradhanmantri jan dhan Yojana in Marathi)

आतापर्यंत योजना सुरु झाल्यानंतर 40 कोटी बँक अकाऊंट ओपन झाले आहे. त्यामध्ये अनेक असे कुटुंबीय आहेत की ज्यांचं आत्तापर्यंत बँकेमध्ये एकही खाते नव्हते. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या योजनेचा  बऱ्यापैकी फायदा झालेला आहे.


 देशाच्या विकासामध्ये खेड्यांचे योगदान खूप आहे. कारण आतापर्यंत जेवढ्या योजना आल्या त्या शहरापर्यंत मर्यादित राहिल्या. त्यामुळे या योजनेचे महत्व खूप आहे.


ही योजना भारतातील गरीब लोकांना ध्यानात ठेवून बनवली आहे . कारण त्यांचा आत्मविश्वास पण  वाढेल आणि त्यांच्या जीवनशैली मध्ये सुद्धा बदल घडून येतील.


प्रधानमंत्री  जन धन  योजनेद्वारे दिली जाणारी  सुविधा.

जीवन विमा ( Life insurance)

प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे खाते खोलनाऱ्या खातेदारांना 30000 हजार रुपयांचा विमा संरक्षण दिले जाणार आहे. आणि कोणतीही इमर्जन्सी आली तर त्यावेळेस 1 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळू शकते.

कर्जाचा फायदा ( loan benefits)

प्रधानमंत्री जन धन योजनेनुसार ज्यांच बँकेत खाते आहे त्यांना 6 महिन्यानंतर 5000 रुपयांपर्यंत कर्जाचा फायदा ते घेऊ शकतात. काही लोकांसाठी हे पैसे खूप कमी असतील पण कारण जन धन योजना गरिबांना ध्यानात ठेवून बनवली आहे. त्यामुळे त्यांच्यात सुरक्षिततेची निर्माण भावना निर्माण होईल.

मोबाईल बँकिंग सुविधा ( mobile banking facility)

तुमच्याकडे असणाऱ्या मोबाईल वरून ह्या बँक खात्याचे व्यवहार तूम्ही करू शकता. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही आहे की योजनेनुसार जर तुमच्याकडे साधा मोबाईल असेल तरीही तुम्ही बँक  खात्याची माहिती  मिळवू शकता.

रुपे कार्ड सुविधा ( rupay card)

प्रधानमंत्री जन धन योजनेनुसार जे खातेदार  आहेत त्यांना रूपे कार्ड (Rupay Card) सुद्धा मिळणार आहे . त्याचा ते योग्य प्रकारे उपयोग करू शकतात.

जिरो बॅलन्स सुविधा ( zero balance suvidha)

जर तुम्हाला बँकेत कोणतेही खाते काढायचे असेल तर तुम्हाला मिनिमम पैसे ठेवावे लागतात. परंतु तुम्ही जर प्रधानमंत्री जन धन योजनेनुसार खाते काढले तर तुम्ही 0 रुपयांमध्ये खाते काढू शकता. म्हणजे कोणतेही पैसे न देता फुकटमध्ये खाते काढू शकता.

प्रधानमंत्री जन धन  खाते खोलण्यासाठी पात्रता.

  1. प्रधानमंत्री  जन धन  योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो भारताचा नागरिक असायला हवा.
  2. 10 वर्षाच्या वयापुढील असलेली मुले ह्या मध्ये आपले खाते काढू शकतात. परंतु त्यांचे आई-वडील या खात्याचा उपयोग करू शकतात.
  3. कोणत्याही व्यक्तीकडे गॅझेटेड ऑफिसर प्रमाणपत्र असेल तर ते जन धन योजनेमध्ये खाते काढू शकतात.
  4. जर एखाद्या व्यक्तीकडे  पहिले खाते असेल तर आपल्या खात्याला प्रधानमंत्री जन धन योजनेत स्थानांतरित (Transfer)  करू शकतो.

प्रधानमंत्री  जनधन योजनेचा लाभ.

  1. प्रधानमंत्री जन धन  योजनेनुसार प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीचे खाते बँकेत काढले जाईल आणि त्यांना 1 लाख रूपयांचा विमा दिला जाईल.
  2.  भारतामध्ये असे अनेक लोक आहेत जे 70 रुपयांपेशा कमी पैशांमध्ये दिवस काढत आहेत त्यांना ह्या योजनेचा फायदा होऊ शकतो.
  3. असे अनेक गरीब लोक होते जे सावकारांकडून पैसे घेत परंतु या योजनेमुळे ते आता थेट बँकिंग प्रणालीशी जोडले जातील.

निष्कर्ष -

प्रधानमंत्री  जन धन योजना एक चांगली योजना आहे. यामुळे जे गरीब लोक आहेत त्यांना थोड्या प्रमाणात आर्थिक संरक्षण मिळेल आणि बँकिंग प्रणाली ही देशातील प्रत्येक भारतीयांपर्यंत
पोहोचवण्यास मदत होईल. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये थोडाफार बदल घडून येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>