बर्ड फ्ल्यू काय आहे. What is bird flue in Marathi

 सध्या देशामध्ये बर्ड फ्ल्यू नावाच्या व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. आपण आजच्या या पोस्ट मध्ये बर्ड फ्ल्यू व्हायरस काय आहे? त्याचा इतिहास काय आहे? त्याची लक्षणे काय आहे ? बर्ड फ्ल्यू पासून तूम्ही कसे सुरक्षित राहाल याविषयी माहिती पाहणार आहोत.बर्ड फ्ल्यू काय आहे. What is Bird flue


बर्ड फ्ल्यू हा आजार प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये आढळतो.हा आजार एका पक्ष्यांमधून दुसऱ्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो.

बर्ड फ्ल्यू हा आजार H5N1 या व्हायरस मुळे होतो. याला एव्हियन इन्फ्ल्यूएन्झा असे म्हटले जाते. हा व्हायरस प्रामुख्याने जंगली पक्षी, पोल्ट्रीतील कोंबडया आणि स्थालांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो.

या व्हायरस चा धोका मानवाला सुद्धा संभवतो कारण हा व्हायरस संसर्गजन्य प्रकारातला आहे.

या व्हायरस चे खुप सारे स्ट्रेन आहेत ज्यामध्ये काही कमी धोकादायक व काही अत्यंत गंभीर स्ट्रेन आहेत.

कधी कधी हा व्हायरस डुक्कर, मांजर, कुत्रे, आणि घोडा यांमध्ये आढळतो.

बर्ड फ्ल्यू चा इतिहास 

हा फ्लू सर्वप्रथम 1900 च्या दशकात इटलीमध्ये सर्वप्रथम आढळला. त्यानंतर 1961 मध्ये दक्षिण आफ्रिकेत या बर्ड फ्ल्यू मुळे लाखो पक्षी संक्रमित झाले. 1983 ला पेन्सिल्वेनिया आणि व्हर्जिनियात हा फ्लू आढळला. 1997 मध्ये हाँगकाँग येथे 18 लोकांना हा फ्लू झाला त्यातील काही लोकांचा मृत्यू झाला. बर्ड फ्ल्यू मुळे मृत्यू होण्याची ही पहिली घटना होती. त्यानंतर हाँगकाँग मध्ये 15 लाख पक्ष्यांना मारण्यात आले. 2006 साली पहिल्यांदा महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू संक्रमित पक्षी आढळले.

व्हायरस

व्हायरस हा एक सूक्ष्मजीव आहे जो जिवंत पेशींमध्ये वाढतात आणि तिथेच पुनरुत्पादित होतो.

व्हायरस हे प्रामुख्याने जिवंत पेशींवर हल्ला करतात आणि त्यांची रासायनिक यंत्रणा स्व:तला जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरतात.

व्हायरस हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. DNA व्हायरस आणि RNA व्हायरस.

तुम्हाला जर प्रवास करायला व वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल जाणून घायचा आवडत असेल तर Hindi Travel XP वेबसाईटला भेट द्या .

एव्हियन इन्फ्ल्यूएन्झा

एव्हियन इन्फ्ल्यूएन्झा व्हायरस चा समावेश RNA व्हायरस या प्रकारामध्ये होतो

 इन्फ्ल्यूएन्झा व्हायरस A 

हा एक संसर्गजन्य रोग आहे. वन्य जलिय प्राणी त्याचे नैसर्गिक धारक आहेत. हा व्हायरस मानवामध्ये संक्रमित झाल्यास हे अत्यंत प्राणघातक होऊ शकते.

इन्फ्ल्यूएन्झा व्हायरस B 

हा व्हायरस विशेषता मानवांना प्रभावित करतो आणि इन्फ्ल्यूएन्झा व्हायरस A पेक्षा कमी सामान्य आणि कमी प्राणघातक आहे.

इन्फ्ल्यूएन्झा व्हायरस C

याचा सामान्यतहा मानवांना, कुत्र्यांना आणि डुक्करांना त्रास होतो. हे इतर इन्फ्ल्यूएन्झा  पेक्षा कमी सामान्य आहेत. आणि याची लक्षणे लहान मुलांमध्ये सौम्य प्रकारे जाणवतात.

बर्ड फ्ल्यू व्हायरस पासून तूम्ही कसे सुरक्षित राहाल.

 • पक्ष्यांच्या संपर्कापासून वाचा कारण हा व्हायरस मुख्यात:हा पक्ष्यांमध्ये आढळतो. तुम्ही पक्ष्यांच्या जास्त संपर्कात आला तर या व्हायरस चा धोका मानवाला संभवतो.
 • पक्षी हाताळताना ग्लोज चा वापर करा.
 • बर्ड फ्ल्यू व्हायरस मुळे चिकन, मांस आणि अंडी हे 70 डिग्री तापमानाला शिजवून खाल्ले पाहिजे कारण याने व्हायरस नष्ट होतो.
 • बर्ड फ्ल्यू संक्रमित भागांमध्ये जाण्यापासून वाचावे.
 • कच्चे मांस आणि अंडी यांना दुसऱ्या वस्तूंपासून दूर ठेवले पाहिजे.
 • साबणाने वारंवार हात धुवावे.
 • पोल्ट्री मध्ये काम करणाऱ्या लोकांनी PPE किट्स चा वापर करावा.
 • H5N1 या बर्ड फ्ल्यू च्या संक्रमित पक्षी आणि मृत्यू पावलेल्या पक्ष्यांच्या संपर्कामुळे हा व्हायरस पसरू शकतो.

बर्ड फ्ल्यू ची लक्षणे

बर्ड फ्ल्यू ची लक्षणे ही कोरोना व्हायरस च्या लक्षणांबरोबर मिळती जुळती आहेत त्यामूळे हा व्हायरस धोकादायक ठरू शकतो.

 1. नाक गळणे
 2. अंगदुखी
 3. कफ होणे
 4. उलटी आल्यासारखे वाटणे
 5. वारंवार अतिसार होणे
 6. डोकेदुखी
 7. गळ्यात सूज
 8. ताप येणे
               ही बर्ड फ्ल्यू ची सामान्य लक्षणे असू शकतात.

            जर तुम्हाला ही पोस्ट महत्वपूर्ण वाटली असेल तर सोशल मीडियावर आणि तुमच्या मित्रांना श शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>