कीवर्ड रिसर्च काय आहे आणि कसा करायचा?

                          तुम्ही एक ब्लॉगर असाल तर कीवर्ड रिसर्च काय आहे आणि कसा करायचा हे तुम्हाला माहिती असायला हवे . बिना कीवर्ड रिसर्च तुमचा ब्लॉग गूगल मध्ये रैंक करणे अवघड आहे. कीवर्ड रिसर्च करणे कठीण काम नाही ,फक्त तुम्हाला बरोबर कीवर्ड शोधता आला पाहिजे याने तुमचे ब्लॉगिंग करियर यशस्वी होण्यास मदत होईल .कीवर्ड रिसर्च काय आहे ( what is keywords research)

कीवर्ड रिसर्च म्हणजे गुगलमध्ये जास्त सर्च होणारे टॉपिक चा  शोध घेणे होय. तुम्हाला ऐकायला सोपे वाटत असेल परंतु ते सोपे नाही आहे. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतात बघायला लागते की तो कीवर्ड किती कॉम्पिटिटिव्ह आहे आणि किती वेळा तो गुगल आणि दुसऱ्या सर्च इंजिन मध्ये सर्च झाला आहे.
                तुमचा ब्लॉग ज्या niche वर आहे तुम्हाला फक्त त्या रिलेटेड कीवर्ड चा शोध घ्यायचा आहे. एक चांगला कीवर्ड चा शोध घेण्यास तुम्ही  यशस्वी झाला तर तुमच्या आर्टिकल गुगल मध्ये रैंक होईल. तुम्ही अशा कीवर्ड चा  शोध घेतला जो सर्च इंजिन मध्ये खूप कमी वेळा सर्च झाला आहे, तर तो कीवर्ड काही कामाचा नाही त्यावर तुम्ही कितीही चांगले आर्टिकल लिहिले तरी ते पहिल्या पेजवर रैंक होणार नाही.

कीवर्ड चे प्रकार ( types of keywords)

तुम्ही जर तुमच्या वेबसाईट साठी कीवर्ड रिसर्च करायचा  विचार असाल तर तुम्हाला हे माहित असायला हवे की कीवर्ड चे वेगवेगळे प्रकार असतात.

शॉर्ट टेल कीवर्ड

तुम्हाला नावावरून कळाले असेल की हा छोटा कीवर्ड आहे यामध्ये फक्त एका शब्दाला टार्गेट केले जाते.  उदा. Money ,Seo , technology इ. या कीवर्ड वर रैंक करणे थोडेसे अवघड आहे .कारण या कीवर्ड वर फक्त हाई अथॉरिटी वाले वेबसाईट रैंक होतात. त्यांच्याबरोबर स्पर्धा करणे खूप अवघड आहे त्यांचा वोल्युम  सर्च खूप जास्त असतो.

मिडिल टेल कीवर्ड 

या कीवर्ड मध्ये दोन शब्दांचा मिळून एक कीवर्ड तयार होतो आणि त्याला टार्गेट केले जाते. उदा. blogging tips, weight loss इ. त्याचे सर्च शॉर्ट टेल कीवर्ड पेक्षा थोडे कमी असतात आणि कॉम्पिटिशन पण कमी होते परंतु रैंक करायला सुद्धा थोडा वेळ लागतो.

लाँग टेल कीवर्ड 

हा कीवर्ड 2 पेक्षा जास्त शब्दांचा मिळून तयार होतो. हे कीवर्ड गुगलमध्ये रैंक करण्यासाठी बाकी कीवर्ड पेक्षा थोडेसे सोपे असतात .तुम्ही अशा  कीवर्ड चा शोध घेऊन यावर पोस्ट लिहायला हवी.  जर तुम्हाला ब्लॉगवर जास्त ट्रॅफिक आणायचे असेल तर तुम्ही लाँग टेल कीवर्ड  चा वापर करू शकता. कारण या की कीवर्ड वर कॉम्पिटिशन कमी राहते.
                           
                      सर्व मोठे मोठे ब्लॉगर त्यांच्या ब्लॉग साठी जास्तीत जास्त लाँग टेल कीवर्ड चा वापर करतात जसे की make money online in India जसे तूम्ही हा कीवर्ड सर्च केले तर तुम्हाला सजेशन येतील की  जसे make money  online India without investment जर या कीवर्ड चा वापर केला तर तुमची आर्टिकल गुगलमध्ये 100% रैंक होतात.


कीवर्ड रिसर्च चे फायदे काय आहे

तूम्ही जर पोस्ट कीवर्ड रिसर्च करून लिहीत असाल तर  गूगल मध्ये रैंकिंग होण्याचे चांसेस काही पटींनी वाढतात. जर बिना कीवर्ड तूम्ही कितीही चांगले आर्टिकल लिहिले तरी लिहिले तरी तुमचा ब्लॉग रैंक होत नाही. एक चांगला  कीवर्ड वापरल्याने तुमचा ब्लॉग वर जास्त ट्राफिक येईल आणी Adsense मधून जास्त earning होईल.

                   कीवर्ड रिसर्च चा सर्वात मोठा फायदा आहे की तुम्ही जेव्हा एखादा  कीवर्ड रिसर्च करतात केव्हा करता तेव्हा तुम्हाला त्याच्याशी संबंधित जास्त कीवर्ड मिळतात. आणि जर तुम्ही ते केवळ कीवर्ड तुमच्या पोस्टमध्ये योग्य जागी टाकले तर तुमची पोस्ट लवकर रैंक होईल.

            कीवर्ड रिसर्च केल्यामुळे तुम्हाला त्या कीवर्ड चे सर्चेस आणि कीवर्ड कॉम्पिटिशन ची माहिती मिळू शकते.

कीवर्ड रिसर्च कसा करायचा


सर्वप्रथम तुम्ही जो कीवर्ड सर्च करता त्याचे सर्चेस किती आहेत ते बघायचे आणि नंतर त्याची कॉम्पिटिशन हाई आहे का लो कारण जे हाई कॉम्पिटिशन वाले की कीवर्ड असतात त्यावर आधीपासून आर्टिकल लिहिलेल्या असतात. त्यावर रैंक करणे थोडेसे अवघड आहे.

                ज्या कीवर्ड ची कॉम्पिटिशन कमी असते त्या कीवर्ड ला टारगेट केले तर ब्लॉग रैंक होण्याचे चांसेस वाढतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो कीवर्ड तुम्ही टार्गेट केला आहे तो कीवर्ड लाँग टेल कीवर्ड असायला हवा. कारण लाँग टेल कीवर्ड गूगल मध्ये लवकर रैंक होतात. आणि यामुळे तुमची डोमेन ची अथोरिटी वाढते.

कीवर्ड रिसर्च टूल 

मार्केटमध्ये कीवर्ड रिसर्च चे खूप सारे टूल उपलब्ध आहे मी काही टूल सांगणार आहे जे सटीक रिझल्ट देतात.

Semrush and Ahref


ह्या दोन SEO टूल आहेत ज्याचा वापर कीवर्ड रिसर्च साठी उपयोग होतो सर्व  प्रोफेशनल ब्लॉगर या टूल चा वापर करतात. कारण एका कीवर्ड च्या बदल्यात 100  कीवर्ड चा शोध घेता येतो आणि सर्च वोल्युम आणि कॉम्पिटिटिव्ह ची माहिती मिळते तुम्हाला फक्त सर्च बारमध्ये तो केवळ कीवर्ड टाकायचा आहे ते तुम्हाला त्या  कीवर्ड ची पूर्ण हिस्टरी दाखवेल.

             तुम्हाला जर एखादा कीवर्ड शोधायचा असेल तर त्या टूल मध्ये वेबसाईट चा ॲड्रेस टाकायचा आणि सर्च करायचे त्या वेबसाईटचे कोणते ब्लॉग रैंक झाले आहेत याची माहिती मिळू शकते.

Ubersugest- हा एक अशी फ्री  टूल आहे इथे तुम्ही  सोप्या पद्धतीने कीवर्ड रिसर्च  करू शकता. तुम्ही जेव्हा कीवर्ड रिसर्च करता तेव्हा कीवर्ड डिफिकल्टी 20 च्या कमी आणि सर्च वोल्यूम 2000 पेशा जास्त असायला हवे तो कीवर्ड तुम्हाला ब्लॉग साठी शोधायचा आहे.

Keywords Everywhere


हा टूल एकदम फ्री आहे. तुम्हाला फक्त ह्या टूल चा एक्सटेन्शन ब्राउझर मध्ये लावायचे आहे जेव्हा तुम्ही गुगलवर एखादा कीवर्ड सर्च कराल तेव्हा तुम्हाला राइट साईडला multiple कीवर्ड दिसतील.

Google keywords planner


तुम्ही जर नवीन  ब्लॉगर असाल तर तुम्हाला या  टूलचा वापर करायला सांगेल. कारण हा टूल गुगलचा आहे जेवढे  कीवर्ड गुगलमध्ये सर्च होतात त्याची एकदम सटीक रिझल्ट मिळतात.

निष्कर्ष

ब्लॉगिंग आज ऑनलाइन पैसा कमवण्यासाठी चांगली संधी आहे. परंतु देईल ते एवढे सोपे आणि जास्त  अवघड सुद्धा नाही आहे.
             आता कीवर्ड रिसर्च काय आहे? आणि कसा करायचा यावर मला तुम्हाला मी  माहिती दिली आहे तुम्हाला जर  ही माहिती आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करा. धन्यवाद!

      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>