महात्मा गांधी वर निबंध मराठी Mahatma Gandhi Essay In Marathi

   Mahatma Gandhi Essay In Marathi महात्मा गांधी वर मराठी निबंध हा निबंध तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत लिहून दिलेला आहे.शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वाचकांसाठी असा हा निबंध आहे.महात्मा गांधी वर निबंध मराठी Mahatma Gandhi essay in Marathi

        महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांना सर्वजण प्रेमाने बापू असे म्हणत.त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई हे होते.


महात्मा गांधींनी आपले प्राथमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी इंग्लंडमधील प्रतिष्ठित कॉलेज मधून वकिलीची पदवी मिळवली.


1893 मध्ये ते एका वकिलीच्या कामासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तिथे ते एकदा रेल्वेत प्रवास करत असताना त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला. त्यांच्याकडे रेल्वेचे फर्स्ट क्लास चे तिकीट असून सुध्दा रेल्वे मध्ये बसून दिले नाही. त्यांचा अपमान करून रेल्वेतून बाहेर काढले, त्यांनतर त्यांनी ठरवले की या वर्णभेदाविरूध्द आपण लढायचे. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत राहून वर्णभेदाविरूद्ध लढा चालू ठेवला आणि भारतीयांना न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी झाले.


1915 साली गांधीजी भारतात परत आले. भारतीयांवर इंग्रज मोठ्या प्रमाणावर अत्याचार करत होते, हे पाहून गांधीजींनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध आपण लढायचे आणि भारतीयांना न्याय मिळवून द्यायचे ठरवले. त्यांनी बिहार मधील चंपारण जिल्ह्यात जाऊन त्यांनी शेतकऱ्यां विरुद्ध होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा दिला आणि यात त्यांना यश मिळाले. नंतर गांधीजींनी अनेक आंदोलनात भाग घेतला व त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यासाठी त्यांना अनेक वेळा जेल मध्ये सुद्धा जावे लागले.


1920 मध्ये गांधींनी व असहकार आंदोलन चालू केले. त्यानुसार त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार, सरकारी शाळांवर बहिष्कार, विदेशी कपड्यांवर बहिष्कार टाकायला सांगितला, व त्यांनी असहकार चळवळीच्या माध्यमातून आपला लढा चालू ठेवला. परंतु चौरा-चौरी येथे हे आंदोलन हिंसक झाले. तेथे शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गोळीबार झाला त्यात हजारो शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घ्यावी लागली. चौरा चौरी येथे झालेल्या घटनेला ब्रिटिशांनी गांधीजींना जबाबदार धरून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली.

परंतु त्यांना आरोग्याच्या समस्यांमुळे पूर्ण शिक्षा व्हायच्या आधीच सोडून दिले, या आंदोलनाचा परिणाम असा झाला की ब्रिटिशांविरुद्ध सामान्यांमध्ये रोष निर्माण झाला. महात्मा गांधीजींनी 1930 साली दांडी सत्याग्रह केला. इंग्रजांनी मिठासारख्या सारख्या जीवनावश्यक वस्तू वर मोठ्या प्रमाणात कर लावला होता. त्यासाठी त्यांनी अहमदाबाद मधील साबरमती आश्रमातून ते दांडी या गावापर्यंत पैदल मोर्चा काढला आणि त्यांनी मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला.

महात्मा गांधीजींनी दलितांसाठी आंदोलन सुरु केले. दलितांवर  होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध यांनी आवाज उठवला. त्यांनी दलितांना हरिजन हे नाव दिले. दलितांसाठी गांधीजींनी 21 दिवसांचे आमरण उपोषण केले. लंडनमध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजींनी भाग घेतला. भारतातील अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांविरुद्ध परिषदेत जोरदार आवाज उठवला. भारतातील अल्पसंख्यांकांच्या प्रश्नासाठी एक कमिटी नियुक्त केली यामध्ये गांधीजींना यश मिळवण्यात मदत झाली.

गोलमेज परिषद वरून परत आल्यानंतर त्यांनी भारतातील स्वातंत्र्य आंदोलनासाठी जोरदार प्रयत्न केले. गांधीजींनी जेलमध्ये असताना हरिजन,यंग इंडिया यासारखे साप्ताहिक वृत्तपत्रे चालू केले, त्यांनी या वृत्तपत्रांमधून भारतीय समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन केले व विविध प्रश्नांना वाचा फोडली.

महात्मा गांधीजींनी 9 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो या आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाला तळागाळातील सर्व लोकांचा पाठिंबा मिळाला त्यामुळे या आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले. गांधीजींनी करा किंवा मरा हा मोलाचा संदेश या आंदोलनातून भारतीयांना दिला, परंतु गांधीजींसह  शेकडो  भारतीय नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलेे. परंतु 6 मे 1944 रोजी गांधीजींना बिनशर्त तुरुंगातून सोडण्यात आले.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींचा सर्वात मोठा वाटा होता.

महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते. त्यांना हिंसा मान्य नव्हती. नेहमी सत्य बोलावे, नेहमी सत्य चालावे यासारख्या तत्वांचा त्यांनी स्वीकार केला होता. महात्मा गांधी फक्त राजकारणी नव्हते तर नव्हते ते थोर तत्वज्ञ होते. त्यांचा विविध पैलूंवर चांगला अभ्यास होता, म्हणून शास्त्रज्ञ आईन-स्टाईन ने गांधीजींबद्दल उद्गार काढले असा कोणी माणूस या धरतीवर निर्माण झाला यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल. गांधीजींनी एका अर्थाने थोर सामाजिक, राजकीय, आर्थिक विचार मांडले.

30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी प्रार्थनेवरून परत येताना नथुराम गोडसे या माथेफिरूने त्यांच्यावर गोळ्या लागल्या आणि ते गत:प्राण होऊन अनंतात विलीन झाले. गांधीजी जरी मेले असले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. पुढे त्यांना राष्ट्रपिता ही पदवी मिळाली राष्ट्रपिता महात्मा गांधी या नावाने ओळखले जाऊ लागले.

3 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>