NDA ची माहिती मराठी NDA information in Marathi

   नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला या पोस्ट मधून NDA बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. जसे की NDA काय आहे? वयोमर्यादा काय आहे? शारीरिक योग्यता किती पाहिजे? NDA चा Syllabus काय आहे. तुम्ही NDA ची तयारी कशी करू शकता.


NDA ची माहिती मराठी NDA information in Marathi

    NDA म्हणजे National Defence Academy ज्याला मराठीमध्ये राष्ट्रीय संरक्षण ॲकॅडमी असे म्हटले जाते. NDA ही एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे जे भारतीय आर्म फोर्सेस साठी ज्युनिअर ऑफिसर ला ट्रेनिंग दिले जाते.NDA मध्ये विज्ञान, टेक्नॉलॉजी, कला आणि मिलिटरी यासारख्या बऱ्याच विषयांवर शिक्षण दिले जाते.

NDA Full Form National Defence Academy
मराठी फूल फॉर्म

राष्ट्रीय संरक्षण ॲकॅडमी


    NDA ही exam  UPSC ( union public service commission) द्वारे घेतली जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होते ही परीक्षा दिल्यानंतर तुमची निवड इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही किंवा इंडियन एअर फोर्स मध्ये होते व तुम्हाला भारतीय संरक्षण ॲकॅडमी (NDA) मध्ये प्रशिक्षण दिले जाते.हे खडतर  प्राशिक्षण पुण्याजवळील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण ॲकॅडमी मध्ये 3 वर्षासाठी दिले जाते. जेव्हा परीक्षार्थी 3 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करतील तेव्हा त्यांना परत 1 वर्षाचे ट्रेनिंग दिले जाते. जे फोर्सेसच्या मुख्य ॲकॅडमी मध्ये दिले जाते.
 • आर्मी कॅडेट असतील त्यांना इंडियन मिलिटरी ॲकॅडमी ( IMA) जी देहराडून येथे आहे. तिथे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते.
 • जे नेव्ही कॅडेट आहेत त्यांना इंडियन नेवल ॲकॅडमी ( INA) Ezimala येथे प्रशिक्षण दिले जाते.
 • वायुसेनेच्या कॅडेट ना पुणे किंवा हैदराबादच्या एअर फोर्स ॲकॅडमी मध्ये दीड वर्षाचे खडतर प्रशिक्षण दिले जाते.

NDA साठी शैक्षणिक योग्यता

 1. जे परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत ते अविवाहित असले पाहिजे. जे विवाहित आहेत ते यासाठी आवेदन करू शकत नाही.
 2. जे परीक्षार्थी 12 वी विज्ञान ( Science) घेऊन physics, Chemistry आणि Math या विषयांमध्ये 60% वर मार्क पाहिजेत. ही योग्यता फक्त इंडियन एअर फोर्स आणि इंडियन नेव्ही साठी आहे.
 3. आर्मी साठी 10+2 पास असणे आवश्यक आहे.
 4. भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा CDS exam काय आहे

NDA साठी वयोमर्यादा

तुमचं वय 16.5 ते 19 वर्ष असणे आवश्यक आहे,तरच तुम्ही या परीक्षेसाठी पात्र ठरता.

NDA साठी शारिरीक योग्यता

 • परीक्षार्थी हा शारीरिक व मानसिकरित्या स्वस्थ ‌ असला पाहिजे.
 • कोणत्याही प्रकारचे शारीरिक दोष म्हणजे वजन कमी किंवा जास्त वजन असले नाही पाहिजे.

 लांबी ( Height)
लांबी ही कमीत कमी 157.5 cm असली पाहिजे आणि एअरफोर्स साठी 162.5 cm असणे अनिवार्य.

छाती ( Chest) 
जे परीक्षार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करणार आहेत त्यांची छाती कमीत कमी 81 सेंटीमीटर असली पाहिजे. श्वास घेतल्यानंतर 5cm छाती फुगवता आली पाहिजे.

NDA चा पॅटर्न

यामध्ये दोन लिखित पेपर असतात पहिला पेपर हा Mathematics वर आधारित असतो, व दुसरा पेपर हा Ability Test चा असतो. Mathematics मध्ये 11 वी 12 वीच्या वर्गाचे टॉपिक्स असतात.
पेपर 2 हा english आणि general knowledge वर  असतो. ज्यात Part A आणि part B मध्ये असतात.

Paper 1 Mathematics
 • Trigonometry
 • Analytical geometry 2D and 3D
 • Differential calculus
 • Integral calculus
 • Differential equations
 • Vector algebra
 • Statistics
 • Algebra
 • Matrices and Determinants
 • Probability
Part 2 general ability test

Part A English
 1. Grammar and usage
 2. Vocabulary
 3. Comprehension
Part B  
 1.   general science
 2. Social studies 
 3. Geography
 4. Physics 
 5. Chemistry
 6. Current event

Interview

तुम्ही जर लिखित परीक्षा पास झाला SSB द्वारे घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीस (Interview) साठी पात्र ठरता, ही मुलाखत Upsc द्वारे घेतली जाते.

NDA साठी काही टिप्स

 1. परीक्षार्थींना आपला गोल तयार करून लवकरात लवकर तयारी सुरू केली पाहिजे.
 2. तुम्ही NDA च्या Syllabus चे वाचून त्याचे विश्लेषण करून प्रत्येक विषय समजून घेऊन तयारी केली पाहिजे.
 3. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले पाहिजे.
 4. तुम्ही एक टाईमटेबल बनवून त्यानुसार आपली तयारी सुरू केली पाहिजे.
 5. इंग्लिश वर जास्त भर दिला गेला पाहिजे, इंग्लिश ग्रामर वर सुद्धा विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.
 6. रोज एक वर्तमानपत्र ( Newspaper) The Hindu किंवा Indian express ही इंग्लिश वर्तमानपत्रे वाचली पाहिजेत.
नोट: NDA ही वेळेनुसार अभ्यासक्रम ( Syllabus) मध्ये बदल करत असते. या विषयी तुम्हाला जास्त माहिती NDA च्या Officials Website वर मिळून जाईल.

             मित्रांनो तुम्हाला मी NDA बद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होईल. तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद!

3 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
–>