शेअर मार्केट म्हणजे काय What is share market in marathi

   शेअर मार्केट म्हणजे काय ? ( What is share market in Marathi ) मित्रांनो पैसे गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी शेअर मार्केट हा एक उत्तम पर्याय  मानला जातो. आजच्या या पोस्टमध्ये आपण शेअर मार्केट काय आहे? कसे काम करते, व त्याचे फायदेे  आणि तोटे काय आहेत, आणि तुम्ही कोणत्या प्रकारे यामध्ये पैसे गुंतवू शकता हे पाहणार आहोत.   


शेअर मार्केट

शेअर मार्केट म्हणजे काय ( What is share market in Marathi)

 स्टॉक मार्केट, शेअर मार्केट आणि इक्विटी मार्केट या तिघांचा एकच अर्थ आहे. जिथे तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअरची खरेदी आणि विक्री करू शकता. शेअर खरेदी म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीत काही प्रमाणात आपली मालकी ( Ownership) असते. जर त्या कंपनीला काही प्रमाणात नफा झाला तर तुम्हाला पण काही प्रमाणात नफा होईल, आणि जर कंपनीला लॉस झाला तर तुमचाही काही प्रमाणात लॉस होईल.

उदा. जर तुमच्याकडे 10000 रुपये आहेत परंतु ते कमी आहेत त्यावेळेस तुम्ही मित्राकडे गेला आणि त्याला तुम्ही सांगितले तू पण 10000 रुपये गुंतवणूक कर आपण 50%- 50%  पार्टनरशिप करू म्हणजे तुमच्या व्यवसायात नफा झाला तर तुम्हाला 50% आणि तुमच्या मित्राला 50% नफा मिळेल.

शेअर मार्केटचा इतिहास

मित्रांनो शेअर मार्केटची सुरुवात 400 वर्षांपूर्वी झाली होती. 1600 साली एक डच ईस्ट इंडिया कंपनी होती. ती आताचा आत्ताचा नेदरलँड हा देश आहे. त्या वेळेस खूप लोक जहाजांव्दारे भ्रमंती करत असे, तर एक कंपनी दुसर्‍या देशाचा शोध लावण्यासाठी  जहाजे पाठवत किंवा व्यापारासाठी जहाजे पाठवत अशी असे.

यासाठी खूप सार्‍या पैशांची गरज होती, हा पैसा कोणत्याही एका व्यक्तीकडे जास्त प्रमाणात नव्हता. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांगितले की या तुम्ही आमच्या जहाजावर पैसे लावा. जेव्हा हे जहाज एखाद्या देशात जाईल तेव्हा तिथला खजाना घेऊन येईल किंवा पैसे घेऊन येईल, त्यातील काही प्रमाणात नफा तुम्हाला मिळेल. परंतु हे काम खूप रिस्की होते, कारण अर्धी जहाजे ही परत येत नसे.

हरवून जात असे किंवा लुटून नेले जात असे. त्यावेळेस तेथील गुंतवणूकदारांनी एका जहाजावर पैसे लावण्यापेक्षा 5-6 जहाजांवर पैसे लावायला सुरुवात केली. कारण कोणते तरी 1 जहाज परत येईल, म्हणजे एका प्रकारे शेअर मार्केट सुरु झाले. आजच्या युगात प्रत्येक देशाची एक स्टॉक एक्सचेंज आहे. आणि प्रत्येक देश हा स्टॉक मार्केटवर अवलंबून आहे.

Indian Stock Exchange

प्रत्येक देशाची एक stock exchange असते. भारतात दोन पॉप्युलर स्टॉक stock exchange आहेत.

1) Bombay stock exchange
यामध्ये जवळ जवळ 5400 कंपन्या रजिस्टर आहेत.

2) National Stock Exchange
यामध्ये जवळ जवळ 1700 कंपन्या रजिस्टर आहेत.

सेन्सेक्स म्हणजे काय

सेन्सेक्स म्हणजे Bombay stock exchange मधील सर्वात टॉपच्या 30 कंपन्या. या कंपन्यांचा Average trend दाखवला जातो, म्हणजे या 30 कंपन्यांचे शेअर खाली किंवा वर जात आहे हे दाखवले जाते.

Nifty म्हणजे काय

Nifty मध्ये National Stock Exchange मधील सर्व टॉपच्या 50 कंपन्यांचा समावेश होतो, या 50 कंपन्यांचा average trend यामधे दाखवला जातो.

कंपनी शेअर कशी विक्री करते

एखाद्या कंपनीला एखाद्या स्टॉक एक्सचेंज मध्ये जाऊन शेअर विकायचे असतील तर त्याला कंपनीचे publice Listing करणे असे म्हणतात. म्हणजे जर कंपनी पहिल्यांदा शेअर विकत असेल त्याला  IPO असे म्हटले जाते. IPO म्हणजेच Intial  publice offering.

SEBI

Securities and exchange board of India ही संस्था शेअर मार्केट नियंत्रित करत असते. म्हणजे कोणत्या कंपनीला शेअर मार्केट मध्ये List करायचे आहे किंवा योग्य प्रकारे List केले आहे का नाही ते पाहते. जर तुम्हाला तुमची कंपनी शेअर मार्केटमध्ये रजिस्टर करायची असेल, तर SEBI चे काही नियम आहेत त्या नियमानुसार तुम्ही तुमची कंपनी List करू शकता.

शेअर कसे खरेदी करायचे

तुम्ही कशाप्रकारे शेअर खरेदी करू शकता जेव्हा इंटरनेट नव्हती तेव्हा नव्हते तेव्हा शेअर मार्केटच्या बिल्डिंग मध्ये जाऊन शेअर खरेदी करावे लागत असे परंतु इंटरनेट आल्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील शेअर खरेदी करू शकता त्यासाठी तुम्हाला DMAT Acoount ची गरज आहे. Zerodha, 5paisa,Upstock यासारख्या ब्रोकर ॲप ची तुम्ही मदत घेऊ शकता. परंतु या आलेत बदल्यात तुम्हाला काही Brokrage Charge सुद्धा द्यावे लागतील. काही ॲप खूपच कमी Brokrage मध्ये ही सुविधा उपलब्ध करून देतात.

शेअर मार्केट रिस्की आहे काय

सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे का. काही लोक याला मटका सुद्धा म्हणतात, कारण यामध्ये रिस्क असते. माझ्यामध्ये हे माझ्या मध्ये हे खरंच रिस्की आहे. कारण जर तुम्हाला माहित नसेल तर, कंपनी कोणत्या प्रकारची आहे, कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, कंपनीचा इतिहास काय आहे, कंपनी वर किती कर्ज आहेत, कंपनी पुढे जाऊन किती यशस्वी होऊ शकते.

हे जर तुम्ही बघितले नसेल तर हे एक प्रकारे मटका खेळण्यासारखेच आहे. जर तुम्ही लोकांचे ऐकून शेअर मार्केटमध्ये पैसे लावले तर खूप रिस्की आहे. तुम्ही कधीही शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट पैसे गुंतवले नाही पाहिजे, योग्य अभ्यास करून पैसे लावले तर शेअर मार्केट तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल.

निष्कर्ष

मित्रांनो मी तुम्हाला शेअर मार्केट काय आहे ( What is share market in Marathi) याविषयी बरीच माहिती दिलेली आहे.
ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही पोस्ट तुम्ही तुमच्या मिञ- मैत्रिणी बरोबर शेयर करा म्हणजे त्यांना सुध्दा शेअर मार्केट बद्दल महिती मिळण्यास मदत होइल. धन्यवाद!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
–>